श्रीरामपूर : शहरातील सूतगिरणी परिसरात राहणारे रामदास भीमराज कडनोर (वय ३४) यांचा मृतदेह कालव्यात आढळून आला होता. पोलीस तपासात त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, रामदास कडनोर यांचा मृतदेह दि. १६ ऑगस्ट रोजी वॉर्ड क्र. दोनमध्ये कालव्यात आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता.

शवविच्छेदन अहवालात कडनोर यांच्या डोक्यात टणक हत्यार मारल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस नाईक अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३७/२०१९ नुसार भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !
- IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत 650 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- 61 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने 17,757% रिटर्न ! 1 लाखाचे झालेत 1.87 कोटी, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे का?
- लँड क्रूझर आणि फॉर्च्युनरमधून भीक मागायला जाणाऱ्या कुटुंबाची गोष्ट !
- EPFO च्या बैठकीत मोठा निर्णय PF व्याजदर कमी होणार