आग्रा: नवीन मोटार वाहन नियमाच्या दंडाच्या रक्कमेची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. आग्रा शहरातील एका दांम्पत्याने अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून त्याला चक्क खोलीत कोंडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घरी येऊन मुलाची सुटका केली आहे.
आग्य्रातील एतमादुद्दौलाच्या शाहदरा परिसरातील धरम सिंह यांनी १२ ऑगस्टला एक नवीन गाडी खरेदी केली होती. त्याचा १६ वर्षीय मुलगा सतत गाडी चालवत होता. मात्र, १ सप्टेंबरपासून सरकारने वाहतून दंडाचे नवीन नियम लागू केले. त्यानंतर वडिलाने मुलाला गाडी देण्यास नकार दिला.

मात्र, मुलगा गाडीसाठी हट्ट करत असल्याने आई-वडिलांनी त्याला खोली बंद केले. दरम्यान, अल्पवयीन मुलाला गाडी चालवताना पकडल्यास नवीन नियमानुसार २५ हजार रूपये दंड असल्याने वडिलांनी मुलाला खोलीत बंद केले होते.
मुलाने आपली सुटका करण्यासाठी थेट पोलिसांना फोन केला. पोलिस आपल्या घरी अचानक आल्याने मुलाचे आई-वडिलही हैराण झाले. त्यांनी मुलाची खोलीतून सुटका केली आणि मुलाला गाडी न चालवण्यासाठी वडिलाचे ऐकण्याचा सल्ला दिला.
‘आम्ही कुटूंबियांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय मुलाला आपल्या आई-वडिलांचे ऐकण्यास सांगितले आहे’, असे एसएसओ उदयवीर सिंह मलिक म्हणाले.’ आग्रा आरटीओ अनिल कुमार म्हणाले की, उत्तर प्रदेशात अजूनही नवीन नियम लागू झालेेले नाही. आताही जुन्याच कायद्यातर्गंत चालन कापले जात आहे.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पुणे-दानापुर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला राज्यातील ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी
- Explained : कोपरगाव काळे-कोल्हे ‘एक्सप्रेस’ पुन्हा धावणार ? कोपरगावात बिनविरोध निवडणूक होईल …
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग