पती पाठोपाठ जखमी पत्नीचाही मृत्यू

Published on -

श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव येथील दोन सख्या भावांच्या जमिनीच्या वादात गंभीर जखमी झालेल्या गोरख भदे यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या गोरख भदे यांच्या पत्नी सुरेखा गोरख भदे यांचाही सोमवार दि.१६ रोजी पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

जमिनीच्या वादातून पती- पत्नीचा मृत्यू आणि आई- वडीलाविना पोरक्या झालेल्या मुलांना पाहुन अंत्यविधी दरम्यान नातेवाईकांसह उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले होते.

दि.२७ ऑगस्ट रोजी मयत गोरख भदे आणि आरोपी शरद भदे यांच्यात जमिनीच्या वादावरून भांडणे झाली होती. या भांडणाच्या रागातून आरोपी शरद भदे व त्याच्या इतर साथीदारांनी मयत गोरख भदे यांचे घर पेटवून दिले होते.

यामध्ये भदे दाम्पत्य गंभीररित्या भाजले होते. या दोघांनाही सुरुवातीला नगर व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गोरख भदे यांचा मृत्यू झाला. त्यावेळी नातेवाईकांनी उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी केली होत.

मात्र पोलिसंनी त्यांची समजूत काढत गोरख भदे यांचा अंत्यविधी उरकून घेतला. भदे यांच्या मृत्यूच्या धक्यातून नातेवाईक सावरतात ना सावरतात तोच सोमवार दि.१६ पहाटेच्या दरम्यान सुरेखा भदे यांनी जगाचा निरोप घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News