नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, तालुक्यातील भंडारदरा धरणातून ३४ हजार १२५ क्यूसेक, तर निळवंडे धरणातून २८ हजार १९८ क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे.

प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अकोले तालुक्यात पावसाची संततधार सर्वदूर सुरूच असून मुळाखोरे, आढळा खोरे, प्रवरा खोऱ्यासह भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे.

त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणात पाण्याची नव्याने मोठ्या प्रमाणावर आवक सुरूच असल्याने भंडारदरा धरणाच्या स्पिलवेतून व तर पॉवर हाऊस टनेलमधून असा एकूण ३४ हजार १२५ क्युसेकने पाण्याचा प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, निळवंडे धरणातून स्पिलवेमधून २७ हजार ४९८ क्युसेक, तर पॉवर हाऊस टनेलमधून ७०० क्युसेकने असा एकूण २८ हजार १९८ क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment