कर्जत: शेती दळणवळणासाठी चांगले रस्ते होणे गरजेचे आहेत. आरोग्य सुविधा, गुणवत्तापुर्ण शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मी पळुन जाणाऱ्यांमधला नसून फक्त फ्लेक्सवर विकास न करता प्रत्यक्षात करून दाखवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.

तालुक्यातील जलालपुर, सिद्धटेक, दूधोडी, भांबोरा, राशीन, तरडगाव, निमगाव डाकु, दिघी, चापडगाव आदी ठिकाणी गावभेट दौरे करत रोहित पवार यांनी तेथील प्रश्न जाणून घेतले. या दौऱ्यात शेती, रस्ते, पाणी या प्रश्नावर ग्रामस्थांकडून लक्ष वेधले जात आहे.
तालुक्याच्या विविध भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पुढील काळात केला जाणार असल्याचे पवार म्हणाले. राशीन येथील जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेत पवार पालखी मिरवणुकीत सहभागी झाले.
- भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway
- 1 मार्चला बँक चालू की बंद ? RBI च्या नियमांनुसार मार्च 2025 मधील बँक हॉलिडे यादी जाहीर!
- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मार्चमध्ये होळीपासून ईदपर्यंत शाळांना सलग सुट्ट्या School Holiday
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…