अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही. ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. यामुळे नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला.
बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी मिळत होता. मात्र आता भाजप सत्तेवर आल्यापासून दरवर्षी २५ते ३० कोटी रुपयांचा निधी या बजेटच्या माध्यमातून रस्त्यासाठी मिळत आहे. पंचवीस वर्षाचा निधी पाच वर्षात भाजप सरकारमुळे मिळाला असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती, आढाववाडी अंतर्गत रस्ते, मेहेर बाबा फाटा रस्ता दुरुस्तीआदि विकास कामाचा शुभारंभ आ.कर्डिले यांच्या हस्ते पिंपळगाव माळवी येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास बाजीराव गवारे, संभाजी पवार, सरपंच सुभाष झिने, प्रा.देवराम शिंदे, माजी सरपंच संतोष झिने, एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, इंद्रभान कदम, सागर गुंड,नानासाहेब झिने, बापू बेरड, गंगाधर पटारे, जानकीराम बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ.कर्डिले म्हणाले की, मागील पाच वर्षात सर्वाधिक विकास निधी भाजप सरकारमुळे मिळाला. राज्यात पुन्हा सत्तेवर भाजप सेनेच सरकार येणार असल्यामुळेच राष्ट्रवादीतील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात. वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये पिंपळगाव माळवी येथील तलावाचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
- कळमकरांना नव्हे, तुम्हाला तिकीट देतो..! आमदारकीला तिकीट देण्यासाठी नगरच्या ‘त्या’ महिलेकडून शरद पवारांच्या नेत्याने लाखो उकळले
- Mahavitaran Apprentice Bharti 2025: बारामती महावितरण अप्रेंटिस भरती 2025; एकूण 99 रिक्त जागा त्वरित अर्ज करा
- Ahilyanagar Breaking : मार्केटजवळ अग्नितांडव ! ‘त्या’ स्क्रॅप गोडावूनला भीषण आग, दोन तास आग विझवण्याचे काम
- विकृती ! विहिरीत गाठोड्यात बांधलेला मृतदेह, पोलिसांची पळापळ; सत्य समोर येताच सगळेच चक्रावले..
- 10 वी 12 च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी !