लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आता आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठीही मदत करणार आहे. फेसबुकने नुकतीच २० देशांमध्ये डेटिंग सेवा सुरु केली. मे महिन्यामध्ये पार पडलेल्या वार्षिक परिषदेमध्ये फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गनं डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखविला होता.
त्यानंतर दोन महिन्यांत फेसबुकची ही सेवा सुरू झाल्याची माहिती झकरबर्गने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणानुसार फेसबुक वापरणाऱ्या २ कोटींहून जास्त युजर्सचे रिलेशनशिप स्टेटस सिंगल आहे.
याच सिंगल युझर्सला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी आता फेसबुकने उचलली आहे. ही सेवा सुरु झाल्याची माहिती देताना झुकरबर्गने सांगितले की, मी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरतो, तेव्हा अनेकजण त्यांना त्यांचा जोडीदार फेसबुकवर भेटल्याचे सांगतात.
हे ऐकून अतिशय आनंद होतो. फेसबुकवर अद्याप डेटिंगचे फिचर दिलेले नव्हते. मात्र ५ सप्टेंबरपासून अमेरिकेत फेसबुक डेटिंगची ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
या सेवेसंदर्भात फेसबुकने सुरक्षातज्ज्ञांचा सुरुवातीपासूनच सल्ला घेतला असल्याने की पूर्णपणे सुरक्षित आसल्याचा दावा झुकरबर्गने केला आहे.
शिवाय युजर्सच्या गोपनीयतेची पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे. जगभरातील २० देशांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे.