‘दूरदर्शन’ ला ६० वर्षे पूर्ण

Ahmednagarlive24
Published:

दिल्ली : एकावेळी देशातील घराघरामध्ये आपली जागा निर्माण करणाऱ्या दूरदर्शनला रविवारी ६० वर्षे पूर्ण झाली. या औचित्यावर अनेकांनी सोशल माध्यमांवर दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला.

महाभारत, हम लोग, फौजी आणि मालगुडी डेजसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांद्वारे दूरदर्शनने लोकांच्या मनात आपला वेगळा कप्पा तयार केला होता. तर बदलत्या काळानुसार दूरदर्शननेदेखील आपली कात टाकत नवीन युगाशी जुळवून घेतले आहे.

दूरदर्शनला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ट्विटरसह विविध सोशल माध्यमांवर लोकांनी आपल्या जुन्या आठवणींना वाट करून दिली. दूरदर्शनवरील तुमचा आवडता कार्यक्रम कोणता, असे प्रश्न सोशल माध्यमांवर दिवसभर विचारले जात होते.

दूरदर्शनचा सुवर्णकाळ आठवून देणाऱ्या आणखी गोष्टी सोशल माध्यमावर टाकण्यात आल्या. आपल्या बालपणाला अधिक स्मरणीय बनविणाऱ्या विविध कार्यक्रमांचा उल्लेख यावेळी लोकांनी केला. दूरदर्शन जुने झाले, हे लक्षात ठेवण्याचा हा क्षण नाही, तर दूरदर्शन बदलत्या वेळेनुसार अधिक नवीन झाले आहे.

फक्त दूरदर्शनचे वय ६० झाले, असे नाही तर भारतातील टेलिव्हिजन प्रसारणाने ६ दशकांचा इतिहास पूर्ण केला आहे. ही बाब भारतातील सर्व टीव्ही उद्योगांसाठी एक मैलाचा दगड आहे, असे प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेंपती म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment