राहुरी : तालुक्यातील कणगर येथील गर्भवती महिला गुहा ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच प्रसूत झाल्याची घटना काल (दि. १५) नऊ वाजता घडली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या समयसूचकतेमुळे गर्भवती माता व नवजात बालकाचे प्राण वाचले.
असे असले तरी महिला सहाव्यांदा गर्भवती असताना कणगर ते लोणी असा प्रवास केला केला जात होता असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील कणगर येथील जया यशवंत आढाव या महिलेला रविवारी सकाळच्या दरम्यान प्रसव वेदना सुरू झाल्या.
नातलगांनी तिला लोणी येथील पीएमटी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला व तात्काळ १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. गर्भवती महिलेला घेऊन रुग्णवाहिका लोणीकडे निघाली असता रस्त्यातच तिला प्रसववेदना सुरू झाल्या.
महिला सहाव्या खेपेची गर्भवती असल्याने पाणमूठ लवकर फुटली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत रुग्णवाहिका लोणी येथे न नेता गुहा येथील ग्रामीण रुग्णालयात आणली. मात्र, प्रवेशद्वारातच महिला बाळंत झाली.
बाळंतीणीने गोंडस मुलाला जन्म देताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, कणगर ते लोणी हा प्रवास का सुचविण्यात आला, महिला सहाव्यांदा बाळंत असल्याने कणगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, अथवा राहुरी फॅक्टरी येथे दाखल करता आली असताना लोणीला नेण्याचा अट्टाहास का करण्यात आला. गुहाचे ग्रामीण रुग्णालय नसते तर काय असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ
- Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती सुरू; करा