राहाता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे. काँग्रेस पक्षानेदेखील धोरणापासून फारकत घेतली आहे. मोठा राष्ट्रीय पक्ष राहिलेल्या काँग्रेस पक्षाला तीन महिने अध्यक्षच नव्हता. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी पडझड झाली.
चांगले बाहेर पडले. आता काँग्रेस पक्षाला दिशाच राहिली नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर फक्त प्रदेशाध्यक्षच काँग्रेस पक्षात राहतील, अशी टीका गृहनिर्माण मंत्री व महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील डोऱ्हाळे, वाळकी या गावात ना. विखे पाटील प्रचारदौऱ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब जपे होते. यावेळी गणेश कारखान्याचे संचालक सुदामराव सरोदे, सरपंच बाबुराव डांगे, उपसरपंच बाळासाहेब डांगे,
बाबासाहेब डांगे, माजी संचालक संजय सरोदे, बाळासाहेब केकाणे, रेवणनाथ गव्हाणे, जे. पी. डांगे, डॉ. विश्वनाथ डांगे, बाजार समितीचे संचालक सुनील जपे, नानासाहेब डांगे, सावळेराम डांगे, श्रावण चौधरी, वैभव डांगे, मिनीनाथ हेंगडे, सतिश गव्हाणे, कोमल गणेश लांडगे, सरोदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..
ना. विखे पाटील म्हणाले, युती सरकारने ४० लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मराठा आरक्षण दिले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या २२ सवलती लागू केल्या. हे सर्व धाडसी निर्णय या सरकारने राज्यात तसेच केंद्रात घेतले. पण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने त्यावेळी हे निर्णय का घेतले नाही? खा. शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी प्रश्नांची सोडवणूक केली नाही.
निळवंडेप्रश्नी शरद पवारांनी विखे पाटलांवर आरोप करत विखे यांचाच निळवंडेला विरोध आहे, असा भोकाडी जिल्ह्यातील आमदारांना त्यावेळी दाखविला होता. तेव्हा हे सर्व एका आवाजात बोलायचे. विखे पाटलांचा विरोध आहे.
सगळीकडूनच असा सूर येत असल्याने लोकांना ते खरे वाटायला लागले. लोकांनी प्रिंपीनिर्मळ, केलवडला आंदोलन केले. वास्तविक निळवंडेच्या मुखाशी कालव्याचे काम अपूर्ण होते. तेथे काय विखे पाटलांचा विरोध होता का? पिचड आता भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे अडचण नाही.
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !
- Dhanjay Munde Resigned : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा ! धनंजय मुंडेंनी घेतला मोठा निर्णय…
- Post Office योजना मध्यमवर्गीयांसाठी गेमचेंजर ! मिडल क्लास लोकांनी ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास काही महिन्यातच त्यांचे पैसे होणार डबल
- TATA Safari EV येत आहे 500km रेंज आणि पॉवरफुल बॅटरीसह – किंमत आणि फीचर्स पहा!
- सावधान ! हॉटेल रूममध्ये लपवलेला कॅमेरा शोधायचा आहे ? या पद्धतीने ताबडतोब तपासा !