अहमदनगर : पाच वर्षात केलेल्या विकासकामांचे व्हिजन घेऊन आ.संग्राम जगताप निवडणुकीत उतरले आहेत. त्यांनी सर्व जनतेपुढे २०२४ चे व्हिजन मांडले आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विरोधी उमेदवाराकडे कोणतेही व्हिजन नसून, प्रचाराचे मुद्देही नाहीत. शहराच्या विकासासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत.
जाती-पातीत तेढ निर्माण करुन दंगली घडविणे, कुटूंबांमध्ये भांडण लावणे एवढाच त्यांचा धंदा आहे. त्यांचा बालेकिल्ला असलेला नेता सुभाष चौक हा अवैध व्यवसायाचा अड्डा आहे. नागरिकांना वाममार्गाला लावण्याचाच त्यांचा धंदा आहे.
असा घणाघाती आरोप आ.अरुणकाका जगताप यांनी केला. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रोफेसर कॉलनी चौकात आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माणिक विधाते यांनी आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
राजेंद्र चोपडा यांनीही मनोगत व्यक्त करुन संग्राम जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी वृक्षमित्र बलभिम डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माणिक विधाते, कुंडिलक दरेकर,
चंद्रकांत गाडे, संजय गाडे, दाळमंडई मर्चंट असो.चे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, बी.एन.शिंदे, दगडू पवार, अॅड.शारदा लगड, नगरसेविका शितल जगताप, ज्योती गाडे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, संजय गाडे, अॅड. सुरेश लगड, अॅड.भुषण र्बहाटे,
दिलीप मिस्किन, बापूसाहेब गिरवले, बाळासाहेब जगताप, सुर्यकांत गाडे, बबन औटी, अॅड.रविंद्र शितोळे, विठ्ठल गुंजाळ, दशरथ खोसे, प्रकाश भागानगरे, विनित पाउलबुधे, सुमतीलाल कोठारी, अनिल मुरकुटे, आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अॅड.शिवजीत डोके यांनी केले तर आभार प्रसाद डोके यांनी मानले.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार