श्रीगोंदा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केवळ हालच झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण स्वत: उभे आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण व अडीअडचणी समजून घेण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आपल्या सुचनेवरून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ.पाचपुते बोलत होते. ते म्हणाले की, आपण मुंबई वरून आल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या.

नुकसानग्रस्त भागात प्रशासकीय अधिकाऱ्याना सोबत घेऊन पाहणी केली. यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, डाळिंब, तूर, मका, सोयाबीन, कापूस आदींचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
पंचनामे करण्यास कर्मचारी कमी पडल्यास इतर विभागातील कर्मचारी देखील या कामात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार नुकसानभरपाई देण्यासाठी सकारात्मक असून शेतकऱ्यांना भरपाई मिळून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात २८ हजार ६८५ हेक्कटर बाधित झाल्याची माहिती आहे. शासनाला हा सर्व अहवाल सादर झाल्यानंतर लवकरात लवर मदत मिळवून देण्यास आपण कटिबद्ध आहोत.
असेही आ.पाचपुते यावेळी म्हणाले. या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के, सभापती शाहजी हिरवे, विठ्ठलराव काकडे, शंकर कोठारे, बाळासाहेब महाडिक, संतोष लगड, बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके आदी उपस्थित होते.
- संगमनेर तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत बनवलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा, हातानेच उखडतोय खडी-डांबराचा थर
- सरकारने मद्याची दरवाढ कमी करावी तसेच करवाढही मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा
- उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून युवकाला शिवीगाळ करत चाकूने हल्ला, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
- भाऊ मानते असं सांगितल्यानंतरही आरोपी विवाहितेच्या घरात घुसला, मारहाण करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ तीन प्रलंबित मागण्यांवर पावसाळी अधिवेशनात निर्णय होणार ?