एकाच दुकानातून दूध आणि चिकन विकण्यास भाजपचा विरोध

Ahmednagarlive24
Published:

भोपाळ: मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने एकाच दुकानातून गाईचे दूध व कडकनाथ कोंबड्याचे मांस व अंडी विकण्याची योजना सुरू केली आहे.

सरकारी पार्लरमधून मिळणारे चिकन व गाईचे दूध यांच्या शुद्धतेची १०० टक्के हमी आहे, असा सरकारचा दावा आहे. सरकारच्या वतीने पहिले दुकान भोपाळमधील नेहरूनगर भागात सुरू करण्यात आले आहे. परंतु या योजनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार रामेश्वर शर्मा यांनी म्हटले, हिंदू धर्मात गाय व तिचे दूध पवित्र मानले जाते. याचा उपवासासाठी तसेच अनेक सणात वापर करण्यात येतो.

जो माणूस चिकन विकतो तोच गाईचे दूध कसे विकू शकतो? यामुळे दोन्ही दुकाने वेगळी करावीत, दोन्ही दुकानाचे मालक वेगळे असावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पशुपालनमंत्री लाखनसिंह यादव यांनी म्हटले, भाजपचे आरोप निराधार आहेत.

चिकन पार्लर व मिल्क पार्लरदरम्यान पार्टीशन आहे. एका भागात कडकनाथचे मांस व दुसऱ्यामध्ये गाईचे दूध विकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment