संगमनेर: सरकारच्या विरोधात राज्यात पर्दाफाश यात्रा काढली जाते, पण तालुक्यातील ३५ वर्षांच्या अपयशाचा पर्दाफाश कोण करणार? कार्यकर्त्यांनाच आता मतभेद विसरुन ठामपणे उभे रहावे लागेल.
देशाचे भवितव्य घडवण्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. या कामाचा संदेश प्रत्येक बूथप्रमुखाने मतदारांपर्यंत पोहोचवला पाहिजे.

उद्याची लढाई निर्णायक आहे, असे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. भाजपच्या तालुक्यातील बूथ आणि शक्तिप्रमुखांचे शिबिर शनिवारी झाले. राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरास जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. जाजू आणि विखे यांनी या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चांगले काम केल्यामुळे पक्षाला यश मिळाले.
डॉ. सुजय विखे यांना दक्षिणेतून मिळालेली खासदारकी आणि मला मिळालेले मंत्रिपद ही पक्षाने आम्हाला दिलेली संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी जिल्ह्यात बारा शून्य असा निकाल लावण्यासाठी एकसंघपणे काम करावे लागेल. ३७० कलम रद्द करण्याचा एतिहासिक निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला. या निर्णयाची प्रतिक्रिया समाजात सकारात्मक आहे.
- शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ! 25% सवलतीत उपलब्ध होणार नवीन घरे, अर्ज कुठे करावा लागणार?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार नवीन वंदे भारत ट्रेन, कसा असणार रूट ?
- 2025 मध्ये ‘या’ 5 शेअर्सने दाखवला जबरदस्त जलवा ! गुंतवणूकदारांना मिळालेत 6000% पेक्षा जास्त रिटर्न
- महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांदा बाजारभाव आता पुढील इतके दिवस वाढतच राहणार, का
- ब्रेकिंग : 1 जानेवारी 2026 पासून ‘या’ लोकांचे आधार आणि पॅन कार्ड डीऍक्टिव्हेट केले जाणार, वाचा सविस्तर













