कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला !

Published on -

जामखेड: मकरंद अनासपुरेच्या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली,तशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हायमॅक्स, चावडी, बगीचा, रस्ते ही कामे चोरीला गेली आहेत.

चार लोकं मोठी होत असतील त्याला विकास म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारते, त्याला विकास म्हणतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी धामणगाव येथे केले.

तालुक्यातीलआनंदवाडी, धामणगाव, तेलंघश, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ,पांढरेवाडी आदी गावांचा गावभेट दौरा करत पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

प्रत्येक गावात लावलेल्या विकासाच्या फ्लेक्सवर रोहित पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, या भागातून ऊसतोड करण्यासाठी जाताना कामगार दिसतात.मला भविष्यात एवढे काम करायचे आहे की, कोणालाही ऊस तोडणीसाठी जावे लागणार नाही.

तरुणांना रोजगार,महिलांच्या हाताला काम देण्याचा मंत्र्यांनी कधी प्रयत्न केला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ते कधी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe