नगर : संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. रस्त्याचे पॅचिंगचे काम मनपा प्रशासनाने लवकरात लवकर करावे अशी मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना देण्यासाठी मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा अधिकारी उपस्थित नसल्याने आयुक्तांच्या दालनाला निवेदन चिकटवून नगरसेवक योगीराज गाडे यांनी निषेध व्यक्त केला
निवेदनात असे म्हंटले की, दिल्लीगेट, न्यू आर्टस कॉलेज, पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड, मिस्कीन मळा रोड, सर्जेपुरा शहरातील मध्य भाग व उपनगरात सर्व ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्त्ये आहेत. शहरात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात रस्त्यात खड्डे पडले आहेत.
त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. मनपा प्रशासनाकडून लवकरात लवकर शहरातील रस्त्यांचे पॅचिंगचे कामे करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल.
यावेळी अतुल गाडे, प्रशांत बोरा, ऋषिकेश काकडे, शुभम पवार, शुभम गाडे, गिरीष शर्मा, संगमनाथ चांदकोटे आदी उपस्थित होते.
- Motilal Oswal यांची Fundamental Picks ! टॉप 5 शेअर्स देणार सर्वाधिक रिटर्न्स
- शिर्डीत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट ! अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र…
- बीड जिल्हा पुन्हा हादरला ! रस्त्यावर रक्ताचा सडा… तिन तरुणांचे खाकीचे स्वप्न चिरडले
- पुणेकरांसाठी खुशखबर : वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?
- अहिल्यानगर जिल्ह्यात दोन खासगी हेलिकाँप्टर ! काय असते किंमत ?