पती, पत्नी व मुलास मारहाण

Published on -

संगमनेर : तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी पती, पत्नी व मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपळगाव कोंझिरा या ठिकाणी विमल बाळचंद आहेर ही महिला आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. सुभाष नरहरी आहेर, अनिता सुभाष आहेर व सतिश सुभाष आहेर यांना म्हणाली की, तुम्ही विनाकारण शिवीगाळ करू नका.

तुमचा भाऊ आल्यानंतर या. याचा राग आल्याने वरील तिघांनीही महिलेसह तिचा पती व मुलगा या तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण क रत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विमल आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हादाखल केला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe