संग्राम जगताप नगरच्या विकासाचा चेहरा :खा. डॉ अमोल कोल्हे

Ahmednagarlive24
Published:

नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले.

नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या माळीवाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.  नगरकरांनी मला संधी दिली.

नगरकरांनी दिलेल्या या संधीमुळेच पाच वर्षांत शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या पध्दतीचे काम करू शकलो. नगर शहर उपनगरात अनेक विकासकामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

त्याच माध्यमातून तरुण पिढीला आयटी पार्कच्या माध्यमातून पाच वर्षांत ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी प्रा. अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषणे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment