तांदूळवाडी : राहुरी नगरपालीका निवडणुकीत राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी बोटक्लब, बाह्यवळण रस्ता, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्काय वॉक, चौक सुशोभीकरण, व्यापारी संकुल, घरकुल योजना, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्वच्छता व आरोग्य रुग्णालय, स्वागत कमान या विकास पर्वाची नवी सुरुवात करण्याची ग्वाही नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती.
यातील किती कामे आतापर्यंत पूर्ण झाली अथवा सुरू आहेत. याचे आत्मपरीक्षण करून तनपुरे यांनी जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान देतानाच निष्क्रिय कोण आहे. हे राहुरीतील जनतेला ठाऊक असल्याचीटीका राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी केली.

राहुरी शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना चाचा तनपुरे पुढे म्हणाले, की नगराध्यक्ष तनपुरे यांनी २०१६ च्या राहुरी नगरपालिका निवडणुकीत मोठा गाजावाजा करून ग्राफिक्स व्हिडिओद्वारे राहुरी शहरातील जनतेला विकास पर्वाची अनेक स्वप्न दाखविली होती.
शहराला स्मार्ट सिटी करण्याची ग्वाही त्यांनी त्यावेळी दिली होती. मात्र आजची शहराची अवस्था पाहिली, तर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंग्यू, चिकणगुन्या यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, मताच्या राजकारणासाठी तनपुरे यांनी विकासाचा बोजवारा केला आहे.
- सापांची भीती वाटते ? मग घरात ही वस्तू अवश्य ठेवा, साप दिसला की शिंपडा, 100% साप पळून जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुम्हालाही योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?
- पावसाळा संपल्याबरोबर 10 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय ! पहिल्या दिवसापासून कमाई सुरु
- लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार ! 12,500 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार 40,00,000 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत आजच गुंतवणूक करा
- Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दर महिन्याला मिळणार फिक्स व्याज