श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना आमदार केल्याशिवाय जनता राहणार नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी केले.
पाचपुते यांच्या प्रचारा निमित्त शहरातून काढलेल्या फेरीच्या वेळी नगराध्यक्ष पोटे बोलत होत्या. श्रीगोंदा बाजार समितीपासून सुरू झालेल्या पायी प्रचार फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

यावेळी नगराध्यक्षा पोटे म्हणाल्या, श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास व शहरातील विविध विकासकामांसाठी पाचपुते आमदार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला व शहराला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न केला.
मागील काही गैरसमजुतीतून पाचपुते यांच्यापासून दूर राहावे लागले. पण आता पुन्हा शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपुते यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहोत.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई