खासदार डॉ. सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

Ahmednagarlive24
Published:

साकुरी : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील ग्रामपंचायत सदस्य कै. नारायण गाडेकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी ते आले होते.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येऊन सरकारकडून जलदगतीने भरपाई कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू, असे डॉ. विखे म्हणाले.

यावेळी शेतकऱ्यांच्या वेदना खा. डॉ. सुजय विखे यांनी समजून घेतल्या. ते म्हणाले, निसर्गनिर्मित संकटाला आपण सगळे मिळून सामोरे जाऊ. सरकारकडे भरीव स्वरुपात मदत कशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले.

यावेळी माजी उपसरपंच विजय कातोरे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिना कर्दनकाळ ठरला आहे. बाजरी, सोयाबीन, डाळिंब, गुलाब शेतीसह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भरीव स्वरुपात भरपाई कशी मिळेल, यासाठी पाठपुरावा करून न्याय द्या, अशी मागणी केली.

यावेळी उपसरपंच अजय जगताप, माजी उपसरपंच विजय कातोरे, भाऊसाहेब कातोरे, बाजार समितीचे संचालक शरद मते, श्रद्धा सबुरी पंतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गाडेकर, कैलास गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते कैलास कातोरे,

रुई येथील सरपंच संदीप वाबळे, गणेश आगलावे, एकनाथ गाडेकर, बी. के. जगताप, धनंजय पाटील, बाळासाहेब गाडेकर, गोविंद गाडेकर, राजेंद्र बी. कातोरे, चांगदेव जगताप, रावसाहेब कडलग यांच्यासह निमशेवडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment