अहमदनगरची घराणेशाही संपवा

Ahmednagarlive24
Published:

कर्जत – नगर जिल्ह्यात घराणेशाही, सत्ता आणि पैशाचे राजकारण सुरु असून ते संपवा. राजकारणात गुन्हेगारी फोफावत आहे, त्यांना राजाश्रय दिला जातोय, त्यामुळे एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्या राज्याचा कायापालट करून दाखवितो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

कर्जत जामखेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अॅड. जाधव, अशोक सोनवणे, सोमनाथ भैलुमे, नंदकुमार गाडे, भगवान राऊत उमा जाधव, द्वारका पवार, सुरेखा सदाफुले, बापू ओहोळ, बापूसाहेब गायकवाड, भीमराव वाघ, महेश आखाडे आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, देशात मंदीचीलाट आहे असे चित्र निर्माण केले जात आहे.

मात्र मंदीची लाट नसून ती आणली जात आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पैशाचे आखाडे सुरु आहेत. त्यातील एक कर्जत जामखेड मतदारसंघ आहे. तुम चेच लुटलेले पैसे तुमच्याकडे घेऊन येतील हा तमाशा थांबवीत स्वाभिमान जागवित त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. नगर जिल्ह्यात घराणेशाही, सत्ता आणि पैशाचे राजकारण सुरु असून ते सपवा.

राजकारणातील गुन्हेगारी फाफावत आहे, त्यांना राजाश्रय दिला जातोय. काही अनुचित प्रकार दाखविण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिल्यास देशद्रोही ठरविले जाते. या सर्वाना पुन्हा सत्तेत आणून गुन्हेगारीला प्रवृत्त करून अभय देणार का? असा सवाल उपस्थित करून देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून त्याला जबाबदार कोण? रिझर्व बँक कंगाल झाली? या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

येथील भाजपा आमदाराने जामखेड ची एम. आय. डी. सी ची जागा विकली कि काय ती कुठे गेली? असा सवाल करीत आमचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा होऊ नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले. मात्र राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी ॲड. आंबेडकर यांचे हात बळकट करा व् मला संधी द्या. नंदकुमार गाडे यांनी प्रास्ताविक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment