जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुलींची छेड काढणार्‍या रोडरोमिओवर कारवाईची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – शहरात मुलींची छेड काढणार्‍या रोडरोमिओवर कारवाई करण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधिक्षकांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, जहीर मुलानी, बाबासाहेब करांडे, महेंद्र बेरड, श्रीपाद वाघमारे, अमोल भंडारे, हसन शेख, गोविंदा शिंदे, गणेश मकासरे, महेश घोगरे, हरीश वाकचौरे, प्रशांत गवळी, मंजाबापू बेरड, सागर बोडखे, वजीर सय्यद, भाऊसाहेब बेरड, अजय सोलंकी, अंकुश ठोकळ, लखन साळे आदि उपस्थित होते.

महापालिका हद्दीतील गंगा उद्यान, महालक्ष्मी उद्यान तसेच विरंगुळा मैदानात सकाळी व सायंकाळी महिला व युवती फिरण्यासाठी येत असतात. हे सार्वजनिक ठिकाण महानगरपालिकेशी निगडित असून, या परिसरात येण्या-जाण्याची संख्या मोठी आहे.

परंतु सर्वसामान्य नागरिकांव्यतिरिक्त काही समाजकंटक रोडरोमिओ व गुंड प्रवृत्तीचे युवक येथे येऊन मुलींची व माता भगिनींची छेड काढतात. तसेच टिकटॉकवर व्हिडिओ बनवितात. तर बागेच्या आतील बाजूस माता-भगिनी समोर धूम्रपान, मद्यपान व हुक्का पार्टी करतात. कोणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना दमदाटी शिवीगाळ करतात.

काही महिन्यांमध्ये या घटनेचे प्रमाण वाढले असून, माता भगिनींच्या संरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तरी या प्रकरणात लक्ष घालून येथील रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment