शिर्डी – राहाता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची साईबाबांच्या मंदिरात सजावट करण्याचा संकल्प साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजराव कोते यांनी केला आहे.
यावेळी त्यांच्या साईनिर्माण उदयोग समुहाच्या वतीने अध्यक्ष विजयराव कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा यांनी सत्कार केला. यावेळी शिडींचे प्रथम नगराध्यक्ष केलासबापु कोते, सामाजिक कार्यकर्ते नितिन उत्तमराव कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, नगरसेवक ताराचंद कोते, ज्ञानेश्वर पवार, धनंजय साळी आदी उपस्थित होते.
यावेळी साईनिर्माण उदयोग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी सांगितले की, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे विकास कामात मोठे योगदान राहीलेले आहे. विधानसभा निवडणकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जेवढे मताधिक्य मिळेल तेवढया फुलांची आकर्षक पध्दतीने साईमंदिरात सजावट केली जाणार आहे.
साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस व साडेतिन मुहर्तापैकी अतिशय महत्वाचा मानला जाणा-या विजया दशमी ( दसरा ) या दिवशी हा संकल्प साईबाबांच्या मंदिरात करण्यात आला. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर ना. विखेंना जेवढे मतदान होईल तेवढचा फुलांची सजावट साईनिर्माण उदयोग समुहाच्या वतीने केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार