राहुरी: शहर वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर गुरुवारी एक नंबर कांद्याला २२०० ते २७०० रुपये, तर गोल्टी कांद्याला १६०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला.
दोन दिवसांपूर्वी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबरला २००० ते २६०० रुपये, तर गोल्टीला १८०० ते २४०० रुपये भाव मिळाला होता.
त्या तुलनेत वांबोरीत १०० रुपये भाव वाढले असले, तरी गोल्टीच्या बाजारभावात क्विंटलमागे २०० रुपयांनी भाव घसरले. वांबोरीतील मोंढ्यावर ७८६३ गोण्यांची आवक झाली.
दोन नंबर कांद्याला १७०० ते २१७५ रुपये, तीन नंबरला ५०० ते १६७५ रुपये क्विंटल भाव मिळाला. ९१ गोण्यांना २८०० रुपये क्विंटल असा अपवादात्मक भाव मिळाला.
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!
- शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा
- शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
- FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !
- Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल