कराची : पाकिस्तानमध्ये व्हिडिओ गेमवरून झालेल्या भांडणामध्ये एका अल्पवयीन मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
मुहम्मदी कॉलनी जिल्ह्यात राजू आणि शाहझीब इक्बाल या १५ वर्षीय दोन मित्रांमध्ये व्हिडिओ गेमसाठीचे टोकन वापरण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर राजूने इक्बालला बेदम मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इक्बालला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजू व त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडणानंतर फरार झालेल्या राजूचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
- अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग आता होणार सिमेंटचा !
- काळ्याबाजारात धान्याची विक्री; मुद्देमालासह चार आरोपी अटकेत
- ‘या’ सरकारी योजनेत 1.20 लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 14 लाखाचे व्याज !
- भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway
- 1 मार्चला बँक चालू की बंद ? RBI च्या नियमांनुसार मार्च 2025 मधील बँक हॉलिडे यादी जाहीर!