गुरुग्राम : काश्मीरमधून कलम ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले छुपे युद्ध आणि दहशतवादी कृत्यांचा समूळ नायनाट करण्याविरोधात निर्णायक लढाई सुरू केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
आपल्या सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कायमची शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षा गार्ड अर्थात एनएसजीच्या ३५ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुग्राम येथील संस्थेच्या प्रशिक्षण स्थळावर मंगळवारी आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमित शाह यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत, यामुळे काश्मीरमधील पाक प्रायोजित दहशतवाद उखडून फेकण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा केला.
दहशतवादाच्या मुद्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे मोदी सरकारचे धोरण आहे. त्यामुळे आम्ही जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० कलम हटवले.
कलम ३७० हटवून या सरकारने पाकिस्तानच्या छुप्या युद्धाविरोधात आणि दहशतवादी कारवायांविरोधात निर्णायक लढाई सुरू केली आहे. यामुळे काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन शाह यांनी केले
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..