अहमदनगर: संपूर्ण देशात स्वछ भारत ही मोहीम सध्या सुरू आहे. या मोहिमेत आपली अहमदनगर महानगरपालिका सहभागी आहे महानगरपालिकेचे महापौर श्री. बाबासाहेब वाकळे मा.आयुक्त तथा जिल्हाधिकारी श्री. राहुल द्विवेदी मा.उपायुक्त श्री सुनील पवार,श्री.डॉ. प्रदीप पठारे,सहायक आयुक्त श्री.मेहेर लहारे, आरोग्य अधिकारी श्री.डॉ. अनिल बोरगे आणि सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
सदर मोहीम आता अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रात अहमदनगर प्रथम क्रमांकावर आहोत. SS2020 वोट फॉर युअर सिटी या app वर सिटीझन फीडबॅक मोठ्या प्रमाणात देऊन नाटय,चित्रपट,सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांच्या सहकार्याने देशात मानांकन मिळविण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,नाटय परिषद,अहमदनगर फिल्म फाउंडेशन,रसिक ग्रुप,बालरंगभूमी परीषद,जिप्सी प्रतिष्ठान, रंगकर्मी प्रतिष्ठान, रंगोदय प्रतिष्ठान या सह कलाकार,तंत्रज्ञ प्रयत्न करणार आहोत.
या मोहिमेत एक नागरिक आणि नाटय,चित्रपट,सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून आपले योगदान असावे अशी कलाकारांच्या बैठकीत सतीश लोटके,जयंत येलूलकर, प्रकाश धोत्रे,सतीश शिंगटे,पी.डी. कुलकर्णी,श्रेणीक शिंगवी,दत्ता पवार,सौ.उर्मिला लोटके,विराज मुनोत,रितेश साळुंके,क्षितिज झावरे,सागर मेहेत्रे,अशोक अकोलकर,अनंत रिसे,उद्धव काळापहाड,सागर खिस्ती, श्रीकांत गरगडे,संजय आढाव सारंग देशपांडे,रवी त्रिभुवन,बाळकृष्ण जगताप,प्रशांत जठार,स्वप्नील नजान यांनी इच्छा व्यक्त करून सिटीझन फीडबॅक घेण्यास सुरुवात केली आहे.
आपल्या शहराच्या नावलौकिकात भर पडावी यासाठी कलाकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून,नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा असे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान आणि नाटय परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अमोल खोले यांनी अवाहन केले आहे.