आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा

Ahmednagarlive24
Published:

राहुरी  : राहुरी मतदारसंघाच्या विकासाकरिता आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा, असे आवाहन अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ आदी भागात सौ. कर्डिले यांनी महिला व कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

सौ.कर्डिले म्हणाल्या, की गेल्या अनेक वर्षांपासून आ.कर्डिले यांनी स्वत:च्या कुटुंबाकडे एव्हढे लक्ष दिले नाही, इतके जनतेच्या विकासाला व सामान्य कार्यकर्ते, माणसाला दिले. मतदारसंघातील समस्या त्यांनी सोडविल्या.

गेल्या पाच वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक कामे झाली असून, पुढील काळात देखील उर्वरित कामे होतील. सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता पुन्हा एकदा आ.कर्डिले यांनाच मत द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment