राहुरीच्या भाजप उमेदवारामुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त

Ahmednagarlive24
Published:

राहुरी – स्वातंत्र्य चळवळीत नगर जिल्ह्याच्या कामगिरीचा मोठा उल्लेख आहे. नव्हेतर राज्य कसे चालवायचे याची दिशा राहुरीतून ठरवली जायची. मात्र आज अनेकांना त्रास देणाऱ्या तसेच अनेक गुन्हे असलेल्या येथील भाजपा उमेदवाराकडे पाहिले तर जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त होत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केली.

नव्हेतर राजकारणातील गुन्हेगारी हद्दपार करा, असे आवाहन करत राहरीतून प्राजक्त तनपुरे आणि श्रीरामपुरातून काँग्रेसचे लहू कानडे यांना विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. आज मंगळवारी सकाळी राहूरीत शरद पवारांची जाहीर सभा झाली.

त्यावेळी ते बोलत होते.पवार म्हणाले, राज्यात महत्वाचा तालुका म्हणून राहुरी तालुक्याचा लौकीक होता. विद्यापीठ आणि उत्तम साखर कारखाना म्हणूनही राहुरीचा लौकीक होता. राज्यात अनेक धोरणं जी ठरली जायची त्याची सुरुवात राहुरीतून व्हायची.

स्व. बाबुराव दादा तनपुरे यांच्या काळात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतरावनाईक, वसंतदादा पाटील ही सर्व मंडळी राहुरीत दोन दिवस थांबायची. बाबुराव दादा हे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करायचे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही राहुरीतून ठरायची. एवढा मोठा लौकीक राहरी तालुक्याला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment