टाकळीमानूर :- विकासकामांना मंजुरी असो नसो. गावागावात नारळ फोडण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. नारळं फोडलेली विकासकामे होणे गर्जेची होती.
निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची आमिषे दाखविली ज़ात आहेत, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतील कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी पं. स. सदस्य किरण खेडकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष पंढरीनाथ केकाण, सरपंच गयाबाई ढाकणे, माजी उपसरपंच राजेंद्र जगताप, दिलीप पवळे, वसंत खेडकर, अंबादास राऊत, अंबादास घुले, मच्छिंद्र पवळे, महारुद्र कीर्तने,
शहादेव ढाकणे, अनिल खेडकर, बाबासाहेब राऊत, सलीम बागवान, विष्णू थोरात, धोंडीराम केळगंद्रे, विठ्ठल ढाकणे, मालेवाडीचे सरपंच पांडुरंग खेडकर, उपसरपंच शहादेव कीर्तने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक ढोले यांनी केले. रवींद्र फुंदे यांनी आभार मानले.
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी