राहुरी – तब्बल १० वर्ष राहुरी तालुक्यावर आमदार म्हणून अधिराज्य गाजवत असलेले आ. शिवाजीराव कर्डिले यांना राहुरी तालुक्याच्या गटा – तटाचा अंदाज आहे.
राहुरी तालुक्याची जनता कुठे जावू शकत नाही, असे समजून यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राहुरी तालुक्यातील मतदारांना ‘गृहीत’ धरल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान दुखावल्याने नाराजीचा सूर दिसत असून ‘मी राहुरीकर’ राहुरीचा आमदार कर’ अशा प्रकारच्या चर्चेने सध्या राहुरी तालुका ढवळून निघत आहे.

राहुरी तालुक्याकडे वर्षानुवर्षे आमदारकी होती. राहुरी तालुक्याचे भूमिपूत्र मतदार संघाच्या स्थापनेपासून आमदार झालेले आहेत. त्यात अनेक घराण्यांचा समावेश आहे, परंतु १० वर्षापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाली. राहुरी मतदार संघामध्ये नगर, पाथर्डीचा काही भाग आला.
त्यामुळे नगरचे असणारे कर्डिले १० वर्षापूर्वी राहुरीत येवून आमदार झाले. तेव्हापासून सलग १० वर्ष ते आमदार असून राहुरी तालुक्यावर वर्चस्व गाजवत आहेत. एकदा नव्हे दोनदा विधानसभा जिंकल्यामळे कर्डिले यांचा कॉन्फीडन्स गगनाला भिडला आहे. त्यामुळे लाखाने निवडून येवू , असे ते सांगत आहेत.
निवडून यायची प्रचंड खात्री झाल्याचे मानून कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील मतदारांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. जणू काही आपल्याला सोडून राहुरीचे मतदार कुठेही जावू शकत नाही. त्यांना आपल्याशिवाय पर्याय नाही.
प्रत्येक गावात दोन – तीन गट आहे. त्यामुळे आपल्याशिवाय पर्याय नाही, असे डोक्यात घेवून कर्डिले हे राहुरी तालुक्यातील मतदारांना ‘गृहित’ धरत असल्याने – मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सर उमटताना दिसत आहे.
वास्तविक पहाता राहुरी तालुका हा पहिल्यापासून स्वाभिमानी आणि स्वयंभू असल्याने अशा प्रकारे कोणीही आपल्याला ‘गृहित’ धरणे हे तालुक्यातील जनतेला मान्य नाही मग तो कितीही मोठा असला तरी राहुरी तालुक्याची जनता अशाप्रकारे मानहानी सहन करणारी नाही.
काही दिवसापासून कर्डिले हटले तरच राहुरी तालुक्यातील भूमिपूत्र आमदार होऊ शकतो, अशा प्रकारची चर्चा राहुरी तालुक्यात सुरू झाली. त्यानंतर आता ‘मी राहरीकर’ राहरीचा आमदार कर’ अशा प्रकारची नवी टूम सध्या तालुक्यात सुरू झाली आहे.
नव्हेतर या नवीन घोषवाक्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान जागृत होत असून सर्वत्र या घोषवाक्याने तालुका ढवळून निघत आहे. त्यामुळे आपोआपच राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश
- नशीब असावं तर यांच्यासारखं! पैसा, प्रसिद्धी, प्रभाव आणि…; ‘या’ मूलांकवर कायम असते सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा
- ‘या’ 10 देशांत बुरख्यावर पूर्णत: बंदी, नियम मोडल्यास थेट तुरुंगवास! यादीत मुस्लिम देशांचाही समावेश
- भारतीयांसाठी आनंदाची बातमी! UAE ने ‘गोल्डन व्हिसा’चे दर केले स्वस्त, जाणून घ्या व्हिसाचे नवीन नियम
- कांद्याची पात की साधा कांदा…आरोग्यासाठी फायद्याचे काय?, जाणून घ्या दोन्हीमधील फरक आणि फायदे!