जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री चहा प्यायल्यानंतर काही महिलांसह १४ जण बेशुध्द पडले. या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती अलवरचे मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी डॉ. ओमप्रकाश मीणा यांनी मंगळवारी दिली.
बाबा मोहनदास यांच्या यात्रेत आलेल्या १५ भाविकांनी एका स्टॉलवर चहा पिला होता. त्यानंतर आपल्याला बेशुध्दी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना भिवाडीच्या सामूहिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

त्यापैकी आठ जणांना बाहेर पाठवण्यात आले आहे. या भाविकांनी अफूमिश्रित चहा प्यायल्याने ते बेशुध्द पडले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास केला जात असून चहाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
यात्रेत राजस्थानशिवाय हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात.
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा
- मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांवर कडक निर्बंध लागू













