आमदारकीचा षटकार ठोकणार: आ. कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : जेऊर गटामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. नगर नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यानंतरही राहुरी मतदार संघात जेऊर गट आहे. आणि तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मी सहाव्या वेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.

आ. कर्डिले यांनी नगर तालुक्यातील ४० गावांमध्ये रॅली काढत जेऊर येथे सांगता सभा झाली. यावेळी उपस्थित गुजतरातचे आमदार केतन इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाजीराव गवारे, सरपंच मधुकर मगर, उपसरपंच बंडू पवार, युवानेते सुनील पवार, माजी सरपंच विकास कोथिंबिरे, दिलीप बनकर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment