सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी

Ahmednagarlive24
Published:

करंजी : राहुरी- नगर -पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे मला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, या सत्तेचा उपयोग मतदारसंघातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करू, असे प्रतिपादन राहुरीचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील मतदारांचे आभार मानण्यासाठी आ. तनपुरे आले असता, चिचोंडी येथे ते बोलत होते. .

आ. तनपुरे यांनी शिराळ, कोल्हार, चिचोंडी , डोंगरवाडी, गीतेवाडी, धारवाडी, डमाळवाडी, लोहसर, खांडगाव, जोहारवाडी, वैजूबाभळगाव, भोसे, दगडवाडी, करंजी येथील कार्यकत्यांर्शी संवाद साधत मोठे मताधिक्य दिल्याबाबत आभार मानले.

आ. तनपुरे पुढे म्हणाले, या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वांबोरी चारीचे पाणी व पिण्यासाठी मिरी- तिसगाव प्रादेशिक नळयोजनेचे पाणी देण्यासाठी संबंधीत दोन्ही योजनांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. पंधरा वर्षे सत्ता नसतानाही कार्यकत्यांर्ना सुख- दु:खात साथ दिली.

विकासकामे करताना सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देता जमिनीवर पाय ठेवून सर्वसामांन्याशी नाळ जुळवून मतदारसंघाचा विकास करू. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली.

माजी सभापती पालवे म्हणाले, गेल्याअडीच वर्षांत या गणात विद्यमान सदस्यांना एकही काम करता आले नाही. मिरी -तिसगाव नळयोजना आम्ही काही दिवस पंचायत समितीच्या माध्यमातून चालवली. मात्र, त्यानंतरच्या काळात या योजनेची वाट लागली आहे. .

या वेळी माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादीचे धीरज पानसंबळ, अप्पासाहेब निमसे, राणाप्रताप पालवे, पिनू मुळे, शंकर वाघ, मोहन गोरे, बबन बोरुडे, किसन दारकुंडे, तुकाराम कुमावत, उपसरपंच संजय गोरे, माजी सरपंच आसाराम आव्हाड, विष्णू गंडाळ, चेअरमन पोपट आव्हाड, संतोष गरुड,

प्रल्हाद आव्हाड, अंबादास डमाळे, भगवान फुलमाळी, जालिंदर वामन, दुर्योधन लोंढे, युवानेते उद्धव दुसंग, सुरेश आघाव, तुळशीदास शिंदे, रवींद्र घोरपडे, ओमकार आव्हाड, नागेश आव्हाड, ऋषभ आव्हाड, सचिन कांबळे, प्रकाश तिवारी, रामदास बुटे ,कैलास कराळे, सुभाष आव्हाड,

बाबासाहेब कराळे, अशोक टेमकर, शंकर टेमकर, अंबादास वारे, बबन वारे ,धनंजय वारे गणेश वारे, भरत शिंदे, बंडू शेख, शिवाजी शिंदे, संजय शिरसाठ, संभाजी औटी, मारुती शिंदे, भाऊसाहेब टेमकर, बाळू टेमकर, बाळासाहेब बांगर, आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment