हक्कासाठी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही : आशुतोष काळे

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेला संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागते.

मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी दिला. संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी ठिकाणी काळे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना सात नंबर फॉर्म भरून देखील पाणी मिळाले नाही. गावतळे भरून मिळावे यासाठी शेतकरी पोळ्याच्या सणाच्या दिवशी तहसीलसमोर उपोषण करीत होते.

दसऱ्याच्या दिवशीही शेतकरी बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून उपोषणाला बसले होते, तर चांदेकसारेचे शेतकरी दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून जिवंतपणी सरणावर बसले होते, असे काळे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment