गडाखांचे एकेकाळचे तीन खंदे समर्थक मुरकुटे यांचे स्टार प्रचारक!

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचाराची आघाडी गडाखांचे एकेकाळचे ३ खंदे समर्थक सांभाळत आहेत. युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गायकवाड हे मुरकुटेंच्या व्यासपीठावर असतात.

अनेक वर्षे गडाखांच्या सभा गाजवणारे गायकवाड फर्डे वक्ते आहेत. प्रत्येक गावांत आमदारांप्रमाणे त्यांचेही कार्यकर्ते आहेत. ते सध्या सांगत सभा गाजवत आहेत. सोनई कारखाना, तसेच शनिशिंगणापूर परिसरातील साहित्यिक एस. बी. शेटे यांना ओळखले जाते.

यशवंतराव गडाखांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ७१ व्या साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग होता. निवडणूक प्रचारात वेगवेगळे मुद्दे आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. वैभव शेटे हे शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त होते. तेथील गैरकारभार त्यांनी बाहेर काढला.

ते न पटल्यामुळे गडाख आणि शेटे यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली. वैभव शेटे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यात अधिकच भर पडली. हे शेटे आता मुरकुटे यांच्या व्यासपीठावर विविध मुद्दे हिरीरीने मांडताना दिसतात.

त्यांना गडाखांचे पारंपरिक विरोधक प्रकाश शेटे साथ देतात. ४० वर्षे गडाखांचे खंदे समर्थक असलेले बिनीचे प्रशासकीय अधिकारी उदयकुमार बल्लाळ हे यशवंतराव गडाखांच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या बरोबर होते.

त्यांनी नोकरी सोडून गडाखांच्या शब्दावर शनिशिंगणापूरच्या प्रशासकीय अधिकारी पदावर काम केले, पण अतिक्रमणाबाबत दुटप्पी धोरणातून झालेल्या वादामुळे बल्लाळ यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी त्रास दिला. पिस्तूल लावून त्यांचे अपहरण केले.

या त्रासामुळे ते गडाखांपासून वेगळे झाले व आता मुरकुटे यांच्या व्यासपीठावरून गडाखांचे कारनामे कथन करत गडाख हे विश्वासघाती असल्याचे ते सांगत असतात.

शिवसेनेच्या नेत्या, पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे यांच्या पत्नी पूजा लष्करे याही व्यासपीठ सांभाळताना दिसतात. ऋषिकेश शेटे, माऊली पेचे, संजय कोलते यांच्या भाषणांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment