अहमदनगर : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू झाली आहे. मागील आठवड्यात सारसनगरमधील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर वैदुवाडी येथे राहणाऱ्या मनपा कामगाराचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला.
बाबाजी शिंदे असे मयत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबाजी शिंदे हे मनपाच्या आरोग्य विभागातील कोंडवाडा विभागात हंगामी कामगार म्हणून कार्यरत होते.
कामामध्ये आरोग्य विभागाची असुरक्षितता असल्याने मनपाच्या हंगामी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपाकडून साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजन करण्यात येत आहे. शहरात डेंग्यूचे प्रमाण नगण्य आहे.
जरी एखादा रूग्ण डेंग्यू सदृश्य आजाराने बाधीत आढळला तर त्यावर साध्या पध्दतीने उपचार केल्यास तो नियंत्रणात येतो. नागरिकांनी पूर परिस्थिती भागास तसेच साथीचे आजार फैलावलेल्या भागास भेट देण्याचे टाळावे, असे मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
- अगदी घरी बसून येईल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स; प्रत्येक दुरूस्तीही होते घरच्याघरी, कशी? तर वाचा
- 10 रुपयांच्या कॉइनबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नवीन गाईडलाईन जारी ! समोर आली मोठी अपडेट
- घरी बसून पेन्शन घ्यायचीय? मग सरकारच्या ‘या’ योजनेची माहिती तुम्हाला हवीच; 1 लाखांपर्यंत मिळेल पेन्शन
- लग्नासाठी कर्ज कोण देतं? अटी काय असतात? कागदपत्रे कोणती लागतात? वाचा सगळी माहिती
- तुमच्या घरावरुन कुणाचं विमान उडतंय..भारताचं की दुश्मनाचं? एका क्लिकमध्ये ‘असं’ करा चेक