पारनेर: तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर पळवे शिवारात दि.२६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास हॉटेल धनश्री हॉटेल समोर उभ्या असलेल्या कंटेनर (क्र.एम.एच. ४६ बी.बी.२५६४) ला पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पो (क्रं.एम.एच१२ एफ.झेड.७९८६) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने टेम्पो चालक जागीच ठार झाला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पळवे शिवारातील हॉटेल धनश्री समोर रस्त्याच्या साईड पट्टीवर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यावेळी पाऊस चालू असल्याने उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कंटेनरवर धडकल्याने त्यात टेम्पो चालक शरद वामनराव पाईकराव (वय -४५ रा सातार माळ ता. पुसद. जि. यवतमाळ) हा ठार झाला तर त्यासोबत असणारा एक जण जखमी झाला.
त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब बबन पारखे रा.वाघुंडे खुर्द यांच्या फिर्यादी वरून सुपा पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- नवलंच ! ‘हा’ आहे भारताचा एकमेव असा जिल्हा जिथे आहेत दोन देशांचे रेल्वे स्टेशन, वाचा…
- Kajwa Festival 2025 : भंडारदऱ्याच्या काजवा महोत्सवावर नियंत्रण येण्याची शक्यता
- अहिल्यानगर पाथर्डी मार्गावरील प्रवासी त्रस्त ! प्रवाशांना आर्थिक मारा
- पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, कर्जतकरांची एकमुखी मागणी
- काकू १ नंबर डान्स ! संजू राठोडच्या नव्या गाण्यावर काकूचा बिनधास्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल, पहा….