छत्तीसगडच्या सरगुजा (अंबिकापूर) मध्ये प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी वेगळी योजना गांधी जयंतीपासून सुरू होत आहे. या अंतर्गत प्लास्टिक कचरा वेचणाऱ्यांना जेवण-नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ‘गार्बेज कॅफे’ही बनवला जात आहे.
अंबिकापूरच्या महापालिकेने शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी या योजनेची एक महिन्यापूर्वी घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश शहराला संपूर्णपणे प्लास्टिकमुक्त बनवणे हा आहे. ही योजना अशी तयार केली आहे की, जे नागरिक कचरा वेचण्याचे काम करतात, त्यांना कचऱ्याच्या बदल्यात जेवण आणि नाष्टा दिला जाईल.
महापालिकेचे सभापती शफी अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक किलो प्लास्टिक कचरा घेऊन येणाऱ्यास ४० रुपयांचे जेवण आणि ५०० ग्राम कचऱ्यावर २० रुपयांचा नाष्टा संंबंधित व्यक्तीला दिला जाईल. यासाठी बसस्थानकांवर ‘गार्बेज कॅफे’ तयार करण्यात येत आहे.
२ ऑक्टोबरपासून तो सुरू होईल. यामुळे शहर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त बनवण्यात मदत होईल. यातून रस्ते, नाल्यात पडलेला प्लास्टिक कचरा एकत्र होईल आणि दुसऱ्या बाजूला कचरा वेचणाऱ्यांना जेवण आणि नाष्टाही मिळेल.
नुकतेच अंबिकापूरला इंदूरनंतर देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. या कॅफेत एकत्र होणारे प्लास्टिक सिमेंट उद्योगात जाळण्यासाठी आणि रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात येईल.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार