…तर पाकचे तुकडे!

Published on -

सूरत : ‘पाकने दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद केले नाही, तर त्याचे तुकडे होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही,’ असा निर्वाणीचा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी भारताविरोधात कुरापती करणाऱ्या पाकला दिला.

‘पाकच्या लोकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय लष्कर सज्ज आहे. आम्ही त्यांना परत जाऊ देणार नाही,’ असे ते म्हणालेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या १२२ जवानांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजनाथ सिंहांनी पाकला उपरोक्त इशारा दिला. ‘पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या लोकांना ‘एलओसी’ न ओलांडण्याचा चांगला सल्ला दिला आहे. कारण, भारतीय सैनिक तयार आहेत. आम्ही त्यांना परत जाण्याची संधी देणार नाही,’ असे राजनाथ म्हणाले.

‘पाकला ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा निर्णय अद्याप पचला नाही. त्याने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रापर्यंत नेला. त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक समुदाय पाकचे काहीच ऐकण्यास तयार नाही,’ असे ते म्हणाले.

‘मानवाधिकारांचे उल्लंघन कुठे होत असेल, तर ते पाकमध्ये होत आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली. याउलट पाकमध्ये शीख, बौद्ध आदी अल्पसंख्याक समुदायांच्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना वाढल्या.

भारतात अल्पसंख्याक सुरक्षित होते, आहेत व भविष्यातही ते सुरक्षितच राहतील. भारत आपल्या नागरिकांशी जातीपातीच्या नावाने भेदभाव करत नाही,’ असे ते म्हणाले. ‘धर्माचे राजकारण करून ब्रिटिशांनी भारताचे २ तुकडे केले; पण १९७१ मध्ये धर्माच्या आधारावर बनलेल्या पाकचेच २ तुकडे झाले.

हे राजकारण भविष्यात असेच सुरूराहिले तर जगातील कोणतीही शक्ती पाकचे तुकडे होण्यापासून रोखू शकत नाही. कोणताही देश पाकचे तुकडे करणार नाही. पाकचे स्वत:च तुकडे होतील. भूतकाळात त्याचे २ तुकडे झालेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News