नगर : बहुजन समाजाला आज समाजात असणार स्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांना दैवत मानणारा सर्व समाज आणि मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्याच बरोबर असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस सुनील शिंदे यांनी केले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजाला एक मोठी ओळख मिळवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीने आपली ताकद दाखवून दिली.


इतर गटांनी राज्यात देशाचे संविधान पायदळी तुडवायला निघालेल्या मनुवादी सेना-भाजपला पाठिंबा दिला. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील या गटांचे नेते जरी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचे सांगत फिरत असले तरी बहुजन समाजातील मतदार मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा पक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीशी ठामपणे उभे आहेत.
त्यामुळे येत्या २१ तारखेला कोणी कुणालाही पाठिंबा दिल्याचे सांगत असले तरी बहुजन समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला मतदान न करता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर शहराच्या विकासासाठी प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या किरण काळे यांनाच शतप्रतिशत मतदान करेल आणि आपली संघटित ताकद दाखवून देईल असा ठाम विश्वास सुनील शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
- महाराष्ट्रातील ‘या’ शहराला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार ! 550 KM चा प्रवास आता फक्त 7 तासात
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार सोयाबीन खरेदी
- लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळणार 2 हप्ते?
- म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील पाणी पुरवठा 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन













