शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथील लक्ष्मण वामन सांगळे (वय ३५वर्षे), रा. गरडवाडी या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी दुपारी शेवगाव -ढोरजळगाव महामार्गावरील सांगळेवस्तीनजीक घडली.

लक्ष्मण सांगळे व त्यांचे सहकारी पाटेकर वस्ती याठिकाणी अक्षयप्रकाश योजनेच्या कामाचे विजेचे खांब उभे करत होते. या वेळी मुख्य विद्युत लाईनमधून खांबात वीज़प्रवाह उतरल्याल्यामुळे सांगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी व आई-वडील, असा परिवार आहे.
लक्ष्मण सांगळे यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल नव्हता.
- रेल्वे मंत्रालयाची २२ हजार पदांसाठी महाभरती; अर्जाची आजच शेवटची संधी
- Omax Autos Ltd च्या शेअरला 20% अपर सर्किट; दमदार तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह
- समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला गती; नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गोंदीया व भंडारा-गडचिरोली मार्गांसाठी फेब्रुवारीअखेर निविदा
- एमजी मॅजेस्टरचे 12 फेब्रुवारीला भव्य अनावरण; भारतातील पहिली D+ एसयूव्ही म्हणून एंट्री
- ATM मधून मिळणार 10 आणि 20 रुपयांच्या नोटा; केंद्र सरकारचा ‘सुपर प्लॅन’ काय आहे?













