नगर – पहिल्यांदा आमदार झाल्यापासून नगर-कल्याण रस्ता परिसराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. पुढील दोन वर्षांत या परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे नियेाजन केले असल्याची माहिती आमदार अरुण जगताप यांनी दिली.
कल्याण रस्ता परिसरातील अनसूयानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक दगडू पवार, दत्तात्रय मुदगल, प्रा.अरविंद शिंदे, संजय शेळके, दिलीप शिंदे, अड. युवराज शिंदे, दत्ता गाडळकर, अतुल वामन, सागर वहाडणे, अरुण ढाकणे,
अदम शेख, बाळासाहेब भापकर, केशव हराळ, शंतनू गायकवाड, ऋषिकेश घुले, शहाजी मोरे, सोमनाथ मोरे, बापूसाहेब कांडेकर, अकबर मनियार, डॉ. प्रदीप सुरवसे, संजय घोडके आदी उपस्थित होते.
- भारतात एक रेल्वे तयार करण्यासाठी किती पैसे लागतात ? Indian Railway
- 1 मार्चला बँक चालू की बंद ? RBI च्या नियमांनुसार मार्च 2025 मधील बँक हॉलिडे यादी जाहीर!
- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मार्चमध्ये होळीपासून ईदपर्यंत शाळांना सलग सुट्ट्या School Holiday
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…