भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा -खा. डॉ. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर – येत्या २४ ऑक्टोबरला राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघाचे रस्त्याचे प्रश्न असो किंवा सर्वात महत्वाचा पाटपाण्याचा प्रश्न असो त्यात हक्काचे पाणी मिळण्यासाठी सरकार पक्षाचे आमदार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांनाच विजयी करा, असे आवाहन खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपुरात काल महायुतीचे उमेदवार आ. कांबळेंच्या प्रचारार्थ भगतसिंग चौकात डॉ. सुजय विखे यांची जाहीर सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शशीकांत कडूस्कर सर होते. यावेळी बोलताना खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, भाजपवर आरोप केला जातो की,सूड भावनेने इंडीच्या चौकशा लावल्या म्हणून, परंतु ज्या सिंचन घोटाळ्यात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला ते पैसे सर्वसामान्य माणसाचे, शेतकर्यांचे होते.

ईडीच्या चौकशीमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येते, मग मुळा प्रवरा बंद पाडून १६०० कामगारांचे प्रपंच उद्ध्वस्त करताना तुमच्या डोळ्यात पाणी का आले नाही? असा सवाल खा. विखे यांनी अजितदादा पवार यांना केला.

अभिनेते खा. अमोल कोल्हे यांच्या सभांना गर्दी होती म्हणून ती गर्दी राष्ट्रवादीसाठी होत नाही तर संभाजी महाराज मालिकेत कोल्हेंनी साकारलेल्या संभाजी महाराजांना पहायला लोक येतात, असे सांगत खा. विखे म्हणाले, श्रीरामपूरचा पाटपाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा असून सरकार युतीचे येणार असल्याने युतीचाच आमदार निवडून आल्याने मोठी विकास कामे होऊ शकतात.

आ. भाऊसाहेब कांबळे हे सर्वाधिक कमी त्रास देणारे आमदार आहेत. कोणालाही त्यांच्यापासून त्रास नाही. त्यामळे त्यांना विजयीकरावे, असे खा. विखे म्हणाले.

काँग्रेस पक्षाची अत्यंत वाईट अवस्था आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे प्रदेशाध्यक्ष आहेत की संगमनेरचे शहराध्यक्ष आहेत हेच कळत नाही विधानसभा निवडणकीत ते संगमनेर सोडायला तयार नाहीत. त्यांचे नेते बँकांकला मोकळे व्हायला गेले आहेत, असेही खा. डॉ. सुजय विखे म्हणाले.

माजी आ. भानुदास मुरकटे म्हणाले की, देशात भाजपा – सेना युतीचे सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याने आपणच भाऊसाहेब कांबळे यांना सेनेमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता.

भाऊसाहेब कांबळे हे स्थानिक असल्याने सहज उपलब्ध होणारे आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नासह इतर सर्व प्रश्नाची सोडवणूक करून श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कांबळे यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे.

त्यामुळे येत्या २१ तारखेला सर्व सुज्ञ मतदारांनी धनुष्यबाण यापुढे बटन दाबून आ. कांबळे यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन मुरकुटे यांनी केले. याप्रसंगी उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे, प्रकाश चित्ते, नगरसेवक अंजुम शेख, रविंद्र गुलाटी, केतन खोरे, नगरसेविका वैशाली चव्हाण, प्रकाश ढोकणे आदींची भाषणे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment