नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३६ कोटींचे अनुदान

Ahmednagarlive24
Published:

नगर: खरीप २०१८ मध्ये दुष्काळामुळे नगर तालुक्यातील शेती पिकाच्या झालेल्या पिक नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ३५ कोटी ८७ लाख ६२ हजार ६२५ इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.

उर्वरित अनुदान वाटप करण्याचे कामकाज सुरू असून यादीतील काही लाभाथ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खाते क्रमांक दुरूस्त करून संबंधित तलाठी कार्यालयामध्ये देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अनुदान वाटप पात्र लाभार्थी यांनी त्यांचेकडील संपुर्ण चालू बँक खातेबाबतची माहिती संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचेकडे देण्यात यावी. जेणेकरुन कोणताही लाभार्थी हा वंचित राहणार नाही. अनुदान वाटप करण्याचा हा शेवटचा टप्पा आहे. तसेच उर्वरीत रक्कम शासनाला पुन्हा माघारी पाठवायची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment