पारनेर : तालुक्यातील लोणीमावळापासून तीन किमी असणाऱ्या नाईकवाडी मळयातील भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या गोठयातील शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळया ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली.
माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये शेतीची कामे करत होती.

याचवेळी बिबट्याने शेळयांवर हल्ला चढवून त्यातील दोन शेळयांचा फडशा पाडला तर एक शेळी ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, शेळीचा आवाज आल्याने नाईकवाडी यांच्या घरातील लोकांनी घराकडे धाव घेताच बिबटयाने धूम ठोकली.
ही माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- आज नाग पंचमीच्या शुभ दिवशी 3 राशींवर होणार धनवर्षाव! पाहा कोणत्या आहेत या भाग्यवान राशी?
- राष्ट्रीय सहकार धोरणामुळे भारताच्या प्रगतीत भर पडणार, युवा नेते विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन
- कांद्याला २००० रूपये हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी स्वाभिमानीकडून उपमुख्यमंत्री पवारांना निवदेन
- संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर मंदिराच्या विकासासाठी भरीव मदत करणार, आमदार अमोल खताळ यांची ग्वाही
- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा व्यापाऱ्यांचा इशारा