राजूर : आदिवासी आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने व रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्याचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले आहे.
राजूर येथील प्रचारसभेत आ. पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपाइं नेते भाई पवार होते. यावेळी माजीमंत्री मधुकरराव पिचड, मधुकर नवले, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, मच्छिंद्र धुमाळ,

सरपंच हेमलताताई पिचड, भाऊपाटील नवले, वसंत मनकर, काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, उपसरपंच गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, गणपत देशमुख, राजेंद्र कानकाटे, मुरली भांगरे, दौलत देशमुख, नीलेश साकुरे, शेखर वालझाडे, पुष्पाताई निगळे,
संगीता पवार, सारिका वालझाडे, काशिनाथ भडांगे, बाळासाहेब लहामगे, बाळासाहेब देशमुख, आयुब तांबोळी, दीपक देशमुख आदी उपस्थित होते.
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा
- मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांवर कडक निर्बंध लागू













