जामखेड :- ३० जेसीबी आणि पाच पोकलेनमधून गुलालाची उधळण करत व चार क्रेनच्या साहाय्याने हार घालत, फटाक्यांची आतषबाजी करत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची शाही मिरवणूक शुक्रवारी जामखेड शहरात काढण्यात आली. सगळे रस्ते गुलालाने माखले होते.
जामखेड मतदारसंघात एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांनी मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. निवडून आल्यानंतर ते प्रथमच आले होते. तालुक्यात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार झाला.
शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक चौकात जेसीबी उभा करण्यात आला होता. अशा ३० जेसीबींमधून गुलाल उधळण्यात येत होता. पोकलेनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने मोठे हार घालण्यात आले.
यावेळी पवार म्हणाले, जनतेने जाती-पातीच्या भिंती तोडून विकासासाठी मतदान केले हे मी विसरणार नाही. सर्वात प्रथम या दुष्काळी भागात पाणी कसे आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य व शिक्षणाला महत्त्व देण्यात येईल. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येईल.
अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश पवार यांनी महसूल व कृषी विभागाला दिले. जी कामे चांगली झाली नाहीत, त्यांची चौकशी केली जाईल. मतदारांनी जो विश्वास टाकला, तो सार्थ ठरवून आदर्श निर्माण करू, असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार