शेतकरी महिलेने मागितले इच्छामरण !

Ahmednagarlive24
Published:

नेवासा : खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महिने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय, जिल्हा व तालुका प्रशासनासह संबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांच्याकडे एकूण आठ वेळा मेल, रजिस्टर्ड पत्रव्यवहार, प्रत्यक्ष कार्यालयात पाठपुरावा, विनंत्या केल्या.

मात्र, अद्यापही वीजपुरठा सुरळीत न झाल्याने अखेर हताश होवून नेवासा बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी महिला शशिकला मनोहर कुटे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना महावितरण कार्यालयात जीवन संपविण्याविषयी लेखी पत्र पाठवून परवानगी मागितली आहे.

या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. . नेवासा बु येथील एक ज्येष्ठ प्रयोगशील शेतकरी कै. मनोहर निलकंठ कुटे पाटील यांनी नेवासा महावितरणशी तीन वर्ष संघर्ष करून नेवासा महावितरणची हुजरेगिरी न करता सनदशीर मार्गाने ग्राहक मंचच्या माध्यमातून वीजपुरवठा प्राप्त करुन घेतला होता.

कालांतराने वीज जोडण्या वाढल्या. त्यामुळे वीजपुरवठा पूर्णदाबाने मिळत नसे. याविषयी अनेकवेळा महावितरणास कल्पना दिली. तत्कालीन इंजिनीअर सातदिवे व वायरमन समाधान यांनी विद्युत रोहित्र मध्यभागी घेण्याचा सव्र्हे करुन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र काम सुरु झाले नाही. त्यातच दि. २८ जून २०१९ रोजी वीजपुरवठा खंडित झालेला आहे.

पतीच्या निधनानंतर शशीकला कुटे यांनी अल्पशेती व बाहेरगावी असल्याने त्याच्याकडे वास्तव्यास न जाता ६४ व्या वर्षी पतीच्या पाठीमागे जिद्दीनेच शेती करण्याचा संकल्प केला. यावर्षीच्या ऐन उन्हाळ्यात आधुनिक पद्धतीने अतिअल्प पाण्यात ठिबकच्या सहाय्याने ऊस पिकाची लागवड केली.

पिकाचे हरण व इतर प्राण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून बांबू व तारापासून कुंपन करुन दुष्काळसदृश्य परिस्थितीत योग्य नियोजन करून एकरी ऊस पिकाचे १०० टनेज काढण्यासाठी नियोजन केले. त्यास दृष्ट लागली ती नेवासा महावितरणची.

नेवासा महावितरण म्हणते तारा चोरीला गेल्या. मग काय त्या शेतकऱ्याने आणून बसवायच्या का? दोनवेळा अशी घटना झाली म्हणून सव्र्हे करून विद्युत रोहित्र मध्यभागी घेवून तारा व खांब रस्त्याच्या बाजूने न्यावा, अशी या शेतकरी महिलेची रास्त मागणी आहे.

यासाठी या शेतकरी महिलेने त्यांच्या मुलामार्फत शासन, प्रशासन व संबंधित कार्यालयाकडे सनदशीर मार्गाने पाठपुरावा केला. . याकरिता सदर महिलेने या निषेधार्थ शासकीय कार्यालयात वास्तव्यास येणे, संबंधितांना साडीचोळी, बांगड्या आहेर भेट देणे, रास्ता रोको करून निवेदन देणे, महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चप्पल हार,

जोडे मारो, प्रेत यात्रा काढणे, घंटानाद करणे आदी आंदोलन करून निषेध केला. नाइलाजास्तव जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे ऑक्टोबरअखेर महावितरण कार्यालयात जीवनयात्रा संपविण्यास परवानगी मागितली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment